अवघ्या ३ तासात सर केला सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने 'सुळखा'...गिर्यारोहकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना ..

 अवघ्या ३ तासात सर केला सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने 'सुळखा'...गिर्यारोहकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना ..



डोंबिवली ( शंकर जाधव ) अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज  जयंतीनिमित्त कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या साहसी गिर्यारोहण  संघाने छत्रपती शिवाजी महाराजांना एक अनोखी व  साहसी  मानवंदना दिली.४८० फुटांचा हा सुळखा सर करायला सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाला केवळ ३ तासांचा वेळ लागला. तासांच्या आत सर करून या संघाने छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी आदरांजली वाहिली.  


जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्यासमोर असलेला वानरलिंगी सुळखा ज्याची उंची ही पायथ्यापासून सुमारे ४८० फूट उंच आहे असा हा सुळखा 3 तासात  सर करून महाराजांना अनोखी आदरांजली वाहिली.जमिनीपासून ते सूळख्याच्या पायथ्याची उंची ही सुमारे ३००० फूट उंच आहे त्यामुळे वानरलिंगी सुळखा आहे.सकाळी  वाजता मोहीमीची सुरुवात करताना  जंगलातून वाट  काढत,वन्य प्राण्यांच्या वावरातनाणेघाटाच्या टोकावरून सूळख्याच्या पायथ्याशी पोहचाले. १ तासात पायथ्याशी पोहचल्या नंतर  मानवंदना म्हणून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघातर्फे महाराजांची आरती करण्यात आली.त्यानंतर संघाने सुळखा सर करायला रोप बांधत असताना संघाने गिर्यारोहण पूर्ण करून सूळख्याचा कळस गाठून शिवरायांना मानवंदना दिली.मोहिमेत पवन घुगे,रणजित भोसले,दर्शन देशमुख, भूषण पवार,अक्षय जमदरे,कल्पेश बनोटे,प्रशिल अंबाडे, प्रतीक अंबाडे, नितेश पाटील,महेंद्र भांडे,सचिन पाटील हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या