चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेच्या "कलारंग "तर्फे यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी

 चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेच्या "कलारंग "तर्फे यंदाची शिवजयंती उत्साहात  साजरी 



 मुंबई  -' कलारंग " तर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने ना. ग आचार्य आणि दा. कृ मराठे या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्यागौरी लेले, क.म. उप प्राचार्या जयश्री जंगले, प्रबंधक संगीता गुरव, वरिष्ठ लिपिक संजय न्हावळदे, मृदुला वाघमारे, वंदना गायकवाड यांनी 'स्पॉटलाईट 'या द्वैवार्षिकाचे  प्रकाशन केले. एन. सी. सी युनिट ने 'राष्ट्रीय एकात्मता 'नृत्यातून सादर केली. माजी विद्यार्थी प्रमोद जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाड्यावर 

बालकलाकारानी अभिनय   सादर केला.तसेच मान्यवर कवींनी  कवितांचेही सादरीकरण केले. 


या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री शैलेशजी आचार्य व श्री हर्षवर्धनजी पांड्ये यांचे होते. तसेच प्राचार्या डॉ विद्यागौरी लेले,  चेंबूर मधील मान्यवर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या