कल्याणात सहा हजार वृक्षरोपांच्या माध्यमातून साकारली शिवरायांची प्रतिमा.....
कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिव जयंती उत्सव मंडळाच्यावतीने या वर्षीच्या शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारली आहे.तिसगांवातील तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात साकारण्यात आलेली ही प्रतिमा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि कलेतून साकारण्यात आली आहे .
कल्याण मधील रुपेश गायकवाड हे स्वःता गेली महिनाभर आपल्या निवासस्थानी शिव प्रतीमेची ही कला कृती प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी सराव करीत होते. ही कलाकृती तिसाई देवीच्या चरणी समर्पीत करण्यात आली आहे. या वर्षीही १९ फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंती दिनी तिसाई देवीच्या प्रांगणात शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिव प्रतिमेचे पुजन होणार आहे. त्यानंतर विविध संस्था संघटनांना वृक्ष रोपांचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी शिव प्रतिमेत वापरण्यात आलेल्या वृक्ष रोपांचेही विविध संस्था संघटनांना वृक्ष केले जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रुपेश गायकवाड, सचिव राजु अंकूश आणि विश्वस्त नरेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले.
0 टिप्पण्या