ठाण्यात श्रेयवादाची लढाई नाही, मात्र कार्यकर्त्यांचा जोश वाढवा म्हणून बोलावं लागत

 ठाण्यात श्रेयवादाची लढाई नाही, मात्र कार्यकर्त्यांचा जोश वाढवा म्हणून बोलावं लागत

                                                                                        - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड



डोंबिवली ( शंकर जाधव ) देवेंद्र फडणवीस यांच्यावर वक्त्यव्य करत फडणवीससारख्या प्रगल्भ नेत्याने से वक्तव्य करणे चुकीचे आहे.ठाण्यात कोणतीही श्रेयवादाची लढाई नाही.राजकारणात अस बोलत कारण त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश वाढतो असे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे डोंबिवलीत म्हणाले.


डोंबिवली पूर्व येथील गोळवली गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ उपस्थित होते.यावेळी उपसभापती  नरहरी झिरवळ  म्हणाले, 

अर्वाच्य भाषा, विधानसभेतील वर्तणूक यामुळे सर्वोच्च न्यायालयाला मध्ये पडावे लागते. यामुळे एक ना एक दिवस सभागृहाचे सार्वभौम अधिकार संपुष्टात येतील. त्यामुळे मी सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावून संविधानिक शब्दांचा वापर झाला पाहिजे असा सूचना देणार आहे. मी आता केवळ राष्ट्रवादी पक्षाचा नाही. सत्ता कोणाची आहे, मुख्यमंत्री कोण आहे यावर वाद घालणे चुकीचे असून बाहेरचे सर्वसामान्य नागरिक आम्ही तुम्हाला वाद घालण्यासाठी निवडून दिले नाही. सुधारणा करण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले असल्याचे माझ्याजवळ बोलतात तेव्हा वाईट वाटते असे झिरवाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या