देशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या हस्ते वंचितच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन
डोंबिवली ( शंकर जाधव ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त डोंबिवली पूर्वेकडील सांगाव मधील संजय नगर येथील वंचित बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कुरवारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाणे महिला जिल्हाध्यक्ष मायाताई कांबळे, डोंबिवली शहर अध्यक्ष अस्मिता सरोदे, उपाध्यक्ष आशा ठोके, महासचिव वैशाली कांबळे, मिलिंद साळवे, बाजीराव माने, अर्जुन केदार, प्रतीक साबळे यांच्यासहित पक्षांचे डोंबिवली शहरातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते .

0 टिप्पण्या