राज्य बॉम्ब शोधक पथकात उत्कृष्ठ काम केलेल्या अंमलदाराचे निधन
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे हवालदार अंकुश इंगळे (५५) यांचे कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. इंगळे सकाळी कर्तव्यावर असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात र उपचारासाठी नेले होते.मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना हृदय विकरचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी राज्य बॉम्ब शोधक पथकात उत्कृष्ठ काम केल्यामुळे त्यांना पोलीस महासंचालकांच्या हस्ते पदक मिळाले होते.करोना काळात त्यांनी अनेक नागरिकांना मदत केली होती.

0 टिप्पण्या