कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर.
डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने १४२ कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील मलंग गड परिसरातील २२ गावात युवक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी कल्याण पूर्व विधानसभेचा आढावा घेण्यात आला. ही बैठक ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कल्याण येथे पार पडली.
या बैठकीत कल्याण पूर्व विधानसभेतील बुर्दुल गावचे सरपंच सुनील पाटील यांची राष्ट्रवादी युवक ठाणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. त्याच बरोबर कल्याण पूर्व विधानसभा व अंबरनाथ तालुका ग्रामीण भागातील तब्बल ७० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.तसेच ठाणे युवक जिल्हाध्यक्ष पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री तथा संपर्कमंत्री ठाणे जिल्हा जितेंद्र आव्हाड यांच्या १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कल्याण दौऱ्याविषयी माहिती देऊन कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला.याप्रसंगी ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर वंडार पाटील, प्रशांत नगरकर, विश्वास आव्हाड, अंकुश पाटील, विजय काठवले, कैलास शेंद्रे, हृतिक पाटील, भावेश सोनवणे, रोहन साळवे, ओम सावंत, प्रतिक सांगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या