नागरिकांना करामध्ये सवलत देण्याची आमदार रविंद्र चव्हाण यांची मागणी

 नागरिकांना करामध्ये सवलत देण्याची आमदार रविंद्र चव्हाण यांची मागणी



डोंबिवली  ( शंकर जाधव ) महाराष्ट्र राज्याचा आणि मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून त्यामध्ये काही गोष्टींना प्राधन्य देण्यात आले आहे. त्यामध्ये नागरिकांना आकारण्यात येणाऱ्या करांचा बोजा कमी करण्यासाठी विशेष धोरण जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा देखील अर्थसंकल्प जाहीर करावा आणि त्यात नागरिकांना आकारण्यात येणाऱ्या करामध्ये सवलत द्यावी अशी मागणी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.


 आमदार चव्हाण म्हणाले, मुंबई व ठाणे महानगरपालिका यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणो पाचशे स्के.फूटार्पयतच्या घरांना सर्व प्रकारच्या करांमधून सवलत देण्यात यावी.कारण कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व जनता मध्यमवर्गीय आणि निममध्यम वर्गीय आहेत. २७ गावे आणि एमआयडीसी रहिवासी परिसर महानगरपालिकेत नव्याने अंतभूत झाल्याने संक्रमणकालीन तरतूदीप्रमाणे कालावधी संपला आहे. त्यांना भरमसाठ मालमत्ता कर आकारला जात आहे. त्यामुळे संक्रमण कालीन तरतूदीप्रमाणे या काळात कोविडमुळे नागरिकांच्या नोकऱ्या मोठया प्रमाणात अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे त्यांना सवलत देऊन तसा प्रस्ताव शासनाकडे त्वरीत पाठवावा. कोरोना काळात करदाते नागरिक आर्थिकदृष्टया अडचणीत आहेत.अशा परिस्थितीत करवसुलीची सक्ती करू नये. आतार्पयत ज्यांनी कर भरला नसेल त्या नागरिकांना वाढीव व्याजदर दंड आकारू नये. वाढीव व्याजदर या आर्थिक वर्षार्पयत पूर्णत: माफ करावा. तसेच हा कर टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी नागरिकांना मुभा देण्यात यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या