भाजप माजी नगरसेवकाच्या 'या' बॅनरची होतेय चर्चा...

कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे नक्की काय म्हणाले ते पहा..


       कल्याण ( शंकर जाधव ) 


सध्या शिवसेना व  भाजप मध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत असताना दुसरीकडे भाजपाच्या माजी नगरसेवकाने शिवसेनेच्या खासदारांना वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे  बॅनर कल्याण शहरात लावले.याची शहरात चर्चा सुरू असताना भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी प्रतिक्रिया दिली.

     तर कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात लावण्यात आलेल्या बॅनरबाबत माजी नगरसेवक दया गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले, खासदारांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले यात सर्वाना आश्चर्य काय वाटते.खासदारांनी जनतेची कामे करत आहेत.मी भाजपात जरी असलो तरी मला त्यांना शुभेच्छा दिल्या  तर त्याच चर्चा करण्यासारखे काय आहे.शुभेच्छा देणारे बॅनर लावले याचा अर्थ वेगळा घेऊ नये.मी भाजपात आहे आणि भाजपातुन उमेदवारी घेऊन निवडणूक लढविणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या