अश्वारूढ पुतळ्याचे थाटात अनावरण

 माझगावमधील महाराणा प्रताप यांच्या

अश्वारूढ पुतळ्याचे थाटात अनावरण



मुंबई -  मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून व मुंबई महापालिकेच्यावतीने माझगाव येथे शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण राज्याचे उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. माझगाव येथील शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरातील बेटावर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाचे तैलचित्र लावण्यात आले आहे.तसेच या ठिकाणी असलेल्या कोनशिलेचे व संविधान उद्देशिकेचे अनावरण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख,महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत,माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर,आमदार यामिनी जाधव, सुनिल शिंदे,पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत,पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार,बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर,नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष रमाकांत रहाटे,स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर,कामगार नेते व शिवसेना माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर, भायखळा विधानसभा संघटक  विजय लिपारे, सिनेट सदस्य निखिल जाधव,उपविभाग प्रमुख राम सावंत,उपविभाग प्रमुख विजय कामतेकर,ई वॉर्डचे सहाय्यक आयुक्त मनीष वळुंज व त्यांचे सहकारी अभियंता व अधिकारी तसेच महाराष्ट्रातील रजपूत समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या