स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या शिवसेना आणि
महाविकासआघाडी चा भाजपा कडून जाहीर निषेध..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकार चा जाहीर रित्या निषेध करण्याकरिता डोंबिवली पूर्व येथील अप्पा दातार चौक येथे भाजपा तर्फे मोठ्या संख्येने एकत्र जमून निदर्शने करण्यात आली. भाजपा चे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड या ठिकाणचा प्रभाग सावरकर यांच्या नावाने होता तो यांनी काढून टाकला आहे, यावरून यांचं सावरकर प्रेम बेगडी आणि खोटं आहे असे खुलेआम दिसत आहे. शिवसेनेचा विचार हा हिंदुत्ववादी विचार राहिलेला नाही तर तो पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या तालावर नाचणारा 'नाच्या' पक्ष झाला आहे हे आता समस्त नागरिकांना कळून चुकलं आहे व याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.
या वेळी आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक राहुल दामले, मंदार टावरे, संदीप पुराणिक, खुशबू चौधरी, ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब, पूनम पाटील, मनीषा राणे, संजू बीडवाडकर, रवीसिंग ठाकूर मिहीर देसाई, मितेश पेनकर, अमित चिकणकार, कृष्ण पाटील आदी या निषेध प्रसंगी उपस्थित होते.
0 टिप्पण्या