प्रभाग रचनेवर मनसेचा शिवसेनेवर थेट आरोप..

   `जिसकी लाठी उसकी भैस`...शिवसेनेचे उमेदवार ठरले आहेत...

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर पावणे दोन वर्ष प्रशासकीय राजवट आहे.कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यावर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार आहे. सर्व राजकीय पक्षांसह नागरिकांना उत्सुकता लागली होती.मंगळवारी प्रशासनाने प्रभाग रचना जाहीर झाल्यावर फक्त मनसे पक्षाने प्रभाग रचनेवर आपेक्ष घेतला. मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी यावर शिवसेनेवर थेट आरोप करत जिसकी लाठी उसकी भैस प्रमाणे वॉड रचना फोडल्याचे सांगितले. या रचना आधीच शिवसेनेला माहित होत्या, म्हणूनच तर शिवसेनेचे उमेदवार ठरले आहेत असे पत्रकारांना सांगितले.   


     पाणी टंचाईबाबत मनसे आमदार पाटील यांनी डोंबिवली एमआयडीसी विगागाचे कार्यकारी अभियंता आर.पी.पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेनंतर आमदार पाटील यांना पत्रकारांनी प्रभाग रचनेबाबत विचारले असता ते म्हणाले,`जिसकी लाठी उसकी भैस`प्रमाणे ज्यांची सत्ता आहे ते त्याच्या हिशोबाने करत आहेत. प्रभाग रचना पहिली तर मला प्रश्न पडतो कि. प्रभाग रचना फोडली का जाते ? सत्ताधारी अपयशी ठरली आहेत का ? त्यांनी केलेले काम जनतेसमोर घेऊन आ जात नाहीत. त्यामुळे कुठेतरी या राज्यकर्त्यांनी आपले अपयश मान्य केले आह असे दिसते. पण मनसेला याची चिंता नाही. मनसेला २०१० साली कल्याण-डोंबिवलीकरांनी भरभरून यश दिले.त्यावेळी मनसेने आणि आताही मनसेने आपली तत्वे विकली नाही,कोणाबरोबर गेलो नाही. प्रभाग रचना बदलली असली तरी जनता मनसेच्या कामावर विश्वास ठेवून मतदान करतील.हि रचना कधीच झाली आहे, म्हणूनच तर शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या प्रभागात कामाला लागलेले दिसतात.मनसे फायदा किंवा तोटा पाहत नाही.जनतेने मनसेची कामे पहावी आणि निवडून आणावे असे आमदार पाटील म्हणाले.ते पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी यांचे फेसबुक पेज बघा त्यात त्यांनी जनेतला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत का ते पण बघा.म्हणून मी जनतेला विनंती करतो कि भावनिक होऊ नका. वास्तविकता काय आहे ते बघा.


************************************************************

 `निवडून दिले आता भोगा`हे राज ठाकरे यांचे म्हणणे आठवते ना...   


  २०१५ च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकित मनसेचे १० उमेदवार निवडणूक आले होते.त्यानंतर डोंबिवली मनसेच्या एका कार्यालयाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले असते ते म्हणाले होते कि. `निवडूक दिले आता भोगा` असे एका वाक्यात सांगून निघून गेले.यांची आठवण करून देत मनसे आमदार पाटील यांनी जनतेला भावनिक होऊ नका वास्तविकता समोर ठेवा असे सांगितले.


     टाकला तर नांदिवली आणि दावडी पाणी टंचाई दूर होईल...


    जुनी लाईन खराब झाली आहे, ते टाकण्याचे काम चालू आहे.मागे याचा आढावा घेतला घेतल्यावर गेल्या डिसेंबर मध्ये हे काम पूर्ण होईल असे सांगितले होते. वैभवनगर येथील ४४० मीटरचा पॅच टाकला तर नांदिवली आणि दावडी पाणी टंचाई दूर होईल. याबाबत पाटील यांना विचारले असता एमआरआरडीसी कल्याण शीळ फाटा रस्त्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे लाईन टाकण्याचे काम थांबवण्यास सांगण्यात आले होते. एमआरआरडीसी अभियंता यांना पाणी पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी हि लाईन टाकण्याचे महत्त्वाचे आहे.असे सांगितल्यावर परवानगी मिळण्यास लाईन टाकली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या