खेळाडूंसाठी शिवसेनेचा पुढाकार... डोंबिवलीतील खेळाडूंना मोफत टेबल टेनिस कोर्ट
डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना काळात सर्व विकास कामे संथगतीने सुरु होती. करोनाची तिसरी लाट ओसरत असताना दैनदिन जीवन पूर्वपदावर येत असताना दिसते. डोंबिवलीतील ३०० ते ४०० टेबल टेनिस खेळाडूंना सरावासाठी डोंबिवली शहरात सुविधा नसल्याने मुंबईत जावे लागत होते.खेळाडूंच्या या समस्येकडे शिवसेनेने लक्ष दिले असून शिवसेनेच्या प्रयत्नांना यश आले आहे. डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथील जिम्नॅशिअम इमारतीत खेळाडूंना मोफत टेबल टेनिस कोर्ट उपलब्ध होणार असून त्यासाठी तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे अशी माहिती स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.
गुरुवारी स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथे पत्रकार परिषद घेऊन टेबल टेनिस कोर्ट लवकरच उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती दिली. ते पुढे म्हणाले,२०१८ साली सभापती असताना डोंबिवलीतील टेबल टेनिस असोसिएशन यांनी मागणी केली होती. त्यावर लक्ष देत २५ लाखाच्या निधीची तरतूद केली होती.कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ययांचे आभार मानतो कि त्याच्यामुळे आज टेबल टेनिस खेळाडूंना डोंबिवलीत सुविधा उपलब्ध होणार आहे.या कामाला मंजुरी मिळाली असून तीन ते चार महिन्यांनंतर खेळाडूंना क्रीडा संकुल येथे मोफत खेळता येणार आहे.
डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथील जिम्नॅशिअम इमारतीत सुरू होणाऱ्या टेबल टेनिस कोर्टमध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि देशपातळीवरील स्पर्धा घेता येईल.तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे माध्यमातून क्रीडा संकुल येथे क्रिकेट खेळाडूंना सरावासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच कुस्तीपटटूसाठी सराव करण्यासाठी जागा, रनिंग ट्रक अश्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
डोंबिवलीत सुमारे ५०० टेबल टेनिस खेळाडू राहत असून त्यातील ३० ते ४० खेळाडूंनी देशपातळीवरील स्पर्धेत भाग घेतला आहे. मात्र या खेळाडूंना डोंबिवलीत शहरात सरावासाठी जागा नसल्याने मुंबईत जागे लागते. टेबल टेनिस असोसिएशनने यावर माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची भेट घेऊन समस्या मांडली होत. यावर म्हात्रे यांनी लक्ष देत २५ लाखाचा निधीची तरतूद केली होती. निधीला मंजुरी मिळाली असून तीन ते चार महिन्यात खेळाडूंना डोंबिवलीतच सरावासाठी जागा उपलब्ध होणार आहे. याबाबत खेळाडूंनी शिवसेनेचे आभार मानले आहे.

0 टिप्पण्या