कविता : नजर लागली गावाला (खंत गीत)
सुंदर माझे गाव होते, धरण घेतले बांधायला ।
कोण्या मेल्याची नजर लागली, माझ्या नरडवे गावाला ।।धृ।।
कधी कोण्या एकेकाळी चांडाळ येऊनिया गेला ।
तेथील सुष्ट्री सौंदर्याला दृष्ट लावुनिया गेला ।।
वेशीवरती धरण योजिले,आले भोग आमुच्या नशिबाला ।।१।।
कोण्या मेल्याची नजर लागली, माझ्या नरडवे गावाला
सह्याद्रीच्या पायथ्याशी वसले हे नरडवे गाव असे।
हिरवेगार मखमली जणू थंड हवेचे ठिकाण जसे ।।
निर्मळ पाणी स्वच्छ हवा, दुर्मिळ होणार आरोग्याला ।।२।।
कोण्या मेल्याची नजर लागली, माझ्या नरडवे गावाला
गांव होते सुंदर माझे, विद्रुप झाले पहा कसे।
माती उखरून विपरीत खड्डे, जणू युद्धभूमी दिसे।।
तेथे भयान विचित्र दिसे, आता नसणार काही नावाला ।।३।।
कोण्या मेल्याची नजर लागली, माझ्या नरडवे गावाला
वीस वर्षांहुन काळ लोटला धरण बांधकामाला ।
धरणग्रस्तांचे प्रश्न सुटेनात जीव आला मेथाकुटीला ।।
अस्तित्वासाठी लढा देऊनी, जागविती शासनाला।।४।।
कोण्या मेल्याची नजर लागली, माझ्या नरडवे गावाला
खंत वाटते मना गावाचे बदलून गेले ते रुप ।
गणपती,होळी-शिमगा,गाव जत्रेत नाही हुरुप ?।।
सागोसुत साकडे श्रीहरीसी, ये सत्वर रक्षा करण्याला ।।५।।
कोण्या मेल्याची नजर लागली, माझ्या नरडवे गावाला
कवी,शाहीर : सागोसुत हरिसंतोष
श्री. संतोष सावित्रीबाई गोपाळराव सावंत
दि.२१ जानेवारी २०२२
८७७९१७२८२४

0 टिप्पण्या