अखिल वैश्यवाणी समाजाचा नूतन वर्ष मेळावा,मुंबई.

 अखिल वैश्यवाणी समाजाचा नूतन वर्ष मेळावा,मुंबई.



अखिल वैश्य वाणी समाज महासंघाच्या वतीने नवीन वर्षानिमित्त समाज बांधवांचा कौटुंबिक मेळावा, जेष्ठ व मान्यवरांचा सत्कार तसेच समाजाच्या नवीन वर्षाच्या २०२२  सालच्या दिनदर्शिका अनावरण   सोहळा असा भरगच्च कार्यक्रम सायन, प्रतिक्षानगर येथील सुवर्ण क्रीडा मंडळाच्या सभागृहात समाजाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र लकेश्री यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात संपन्न झाला. 

       सायन विभागातील जेष्ठ नगरसेवक व शिवसेना विभाग प्रमुख श्री. मंगेश सातमकर तसेच एफ/उत्तर, एफ/दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष व नगरसेवक श्री. रामदास कांबळे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून मेळाव्याचे उदघाटन केले. प्रास्ताविक भाषण संस्थेचे सरचिटणीस श्री. विनायक हेगिष्टे, श्री.लवू नर यांनी करून संस्थेच्या तिन वर्षाच्या कार्याचा अहवाल सादर केला. सुरूवातीला समाजातील तसेच कोरोना  काळात मृत्यू झालेल्या लोकांना श्रध्दांजली वहाण्यात आली. यावेळी दिनदर्शिका २०२२चे श्री. मंगेश सातमकर व श्री.रामदास कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गुरुनाथ बेर्डे, श्री. संदीप तानवडे, सरचिटणीस विनायक हेगिष्टे, चिटणीस, लवू नर , दत्ताराम वंजारे, श्री. कृष्णा गंधे यांच्या हस्ते श्री. मंगेश सातमकर, श्री. रामदास कांबळे, माजी नगरसेविका श्रीमती. प्रणिता वाघधरे, मनवासे उपाध्यक्ष श्री. सुनिल परब, कामगार नेते श्री.आनंद नारकर, शाखाप्रमुख श्री. संजय म्हात्रे, सुधीर शिरगावकर, विलास अपराध, प्रमोद चिंतल, रूपेश किर्लोस्कर, समाज सेवक श्री. दशरथ पवार, अपना सहकारी बँकचे मॅनेजर श्री. आशिष जागुष्टे व इत्यादि मान्यवर पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ, नारळ देवून यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी समाजातील जेष्ठ नागरिक सौ. मानिनी रघुनाथ शेरे, अनंत गांधी, रघुनाथ पाटणकर, यशवंत जैतपाल,प्रभाकर गांगण,चंद्रकांत सक्रिय व शशिकांत लाड इत्यादिंचा तसेच परभणी येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कुमारी वैष्णवी विशाल रेडीज व कबड्डीपटू कुमार. सिध्देश अंकुश नर  यांचा सत्कार श्री.मंगेश सातमकर व श्री. रामदास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती.पल्लवी ताठरे,नम्रता लाड, कल्पना तोडकरी,सुजाता कोलते, करिष्मा पाथरे इत्यादीनी अहोरात्र मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या