स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थिनींनी घेतले लाठीकाठी प्रशिक्षण
कोरोना परिस्थितीनंतर विद्यार्थ्यांना मोबाईल मधून बाहेर काढण्यासाठी ह्या शिबीराचे आयोजन केल्याची माहिती यावेळी संस्थेचे कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी दिली.
शाळेसमोर नेहरू मैदानावर लाठीकाठी प्रशिक्षणाचे उद्घाटन नारळ वाढवून करण्यात आले.कार्यक्रमासाठी संस्थेचे उपकार्यवाह प्रमोद उंटवाले,संस्था पदाधिकारी विद्याधर शास्त्री ,नरेंद्र दांडेकर, सदस्य प्रकाश म्हात्रे,प्रशिक्षक सिध्दी साळवी,ओंमकार नान्हे ,शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र व इतर राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे.त्यासाठी विद्यार्थीनीनी स्वत:चे संरक्षण स्वत:च करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नरेंद्र दांडेकर यांनी सांगितले.
लाठीकाठी प्रशिक्षणात विद्यार्थीनींनी, संस्थाचालकांनी, सर्व शिक्षकांनी देखिल सहभाग घेतला होता. नन्हे यांनी 'खेळ व आहार'यावर व्हीडीओद्वारे पी पी टी प्रेझेंटेशनने अनेक उदाहरणाद्वारे माहीती दिली.दुस-या दिवशी दोन तास लाठी काठी प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर अशोक शेनवी व प्रकाश म्हात्रे यांनी दोरीच्या गाठीचे प्रकार साधी गाठ,सरकती गाठ,मोळी गाठ,चौरस गाठ विद्यार्थ्यांकडून करून घेतले .तिस-या दिवशीही लाठीकाठी प्रकार घेण्यात आले.त्यानंतर म्हात्रे यांनी प्रथमोपचार ,बँन्डेज व स्ट्रेचरचे प्रकार यांची माहीती दिली.त्यानंतर शिबीराचा समारोप करण्यात आला. सृष्टी मुंगये ह्या विद्यार्थीनीने इंग्रजी मधून तर महिमा पाथरे हिने मराठीतून तीन दिवशीय शिबीरातून मिळालेल्या प्रशिक्षणाबाबतची माहीती दिली.महिला सबलीकरणासाठी,आत्ताच्या कलीयुगात महिलांवरील अतिप्रसंग रोखण्यासाठी,महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी ह्या तीन दिवसीय शिबीराचे आयोजन केले होते.यात शाळेतील जास्तीतजास्त विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.शाळेतील क्रीडा शिक्षक जाधव यांनी शिबीरासाठी खूप मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश पाटील यांनी केले.नरेंद्र दांडेकर यांनी प्रास्ताविक केले.

0 टिप्पण्या