पोलिसांना तपासात `हा`धागा पकडला आणि अपहरणकर्ते पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांना तपासात `हा`धागा पकडला आणि अपहरणकर्ते पोलिसांच्या जाळ्यात 



 डोंबिवली ( शंकर जाधव ) पैशावरून एजंटमध्ये झालेल्या वादातून तिघांनी एकाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली.विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांनी ज्याचे अपहरण केले त्याच्या मोबाईलवरून मुलीला त्याच्या अकाउंटचा चेक पाठवून त्या अकाउंटमध्ये पाच लाख रुपये ट्रान्स्फर करा नाहीतर तुझ्या वडिलांचे जीवांचे काहीतरी बरेवाईट करू अशी धमकी दिली.तर ज्या हॉटेलमध्ये एजंटला बंदिस्त केले होते त्या हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नावाची नोंद केली होती. नेमका हाच धागा पकडून मानपाडा पोलिसांनी तीन अपहरणकर्त्यांना हॉटेलमधून पकडून बेड्या ठोकल्या.       


    

    मनजीत यादव, धनंजय यादव, सोमप्रकाश यादव  असे अटक केलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत मनजीत यादव आणि  सुभाशिष बॅनर्जी हे एका शिपिंग व्यवसायात एजंट म्हणून काम करत असताना त्यांच्यात पैशांच्या हिशोबावरून वाद झाले होते.मनजित याने त्याचा साडू धनंजय आणि त्याच्या गावातील एका ओळखीचा तरुण सोमप्रकाश या दोघांना घेऊन ६५ वर्षीय एजंट सुभाशिष यांच्या अपहरणाचा कट रचला.तिघांनी ३ डिसेंबर रोजी बॅनर्जी यांना त्याच्या घरातून उचलून अपहरण केले.बॅनर्जी यांना अपहरणकर्त्यांनी विविध ठिकाणी पकडून बंदिस्त केले होते.बॅनर्जी यांच्या मोबाईलवरून त्याच्या मुलीकडे पाच लाख रुपयांची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.


 बॅनर्जी यांचे अपहरण केल्याचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले.अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपयुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांचे सहकारी दत्तात्रय सानप,सुनील तारमळे, प्रशांत वानखेडे यांनी तपास सुरु केला.मनजीत यांच्या अकांऊटवरून पोलिसांची त्यांची माहिती काढली.तर त्यांच्या संपर्कात असलेल्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरु केला. मनजीत यांच्या मोबाईल क्रमांक ट्रॅक केल्यावर तो कुठे कुठे गेल्याची माहिती मिळवली.या माहितीनुसार मनजीत नवी मुंबईत असल्याची माहिती मिळाली तर नालासोपारा येथेही एका हॉटेल तो थांबला असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांचा संशय नालासोपारा येथील गोराई नाका मधील रॉयल इन हॉटेलवर गेला.पोलिसांनी हॉटेल मध्ये चौकशी केली असता रजिस्टरमध्ये बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख आणि त्यांच्या वर्णनाचा इसम एका रूम मध्ये असल्याचे समोर आले.पोलिस पथक रूम मध्ये गेल्यावर त्यांना बॅनर्जी आणि अपहरणकर्ते राहत असल्याचे दिसले.पोलिसांनी अपहरणकर्त्यांना अटक करून बॅनर्जीची सुटला केली.


पकडले गेले नसते तर  अपहरणकर्ते भोपाळला पळाले असते...


    मनजीत यादव, धनंजय यादव, सोमप्रकाश यादव या तीन अपहरणकर्त्यानी सुभाशिष बॅनर्जी यांचे अपहरण करून त्यांना विविध ठिकाणी नेऊन बंदिस्त केले होते.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी गजाआड झाले.याप्रकरणी तपास अधिकारी सुनील तारमळे यांना विचारले त्यांनी अधिक माहिती दिली. अपहरणकर्ते पकडले गेले नाहीत भोपाळला पळाले असते. जर ते भोपाळला गेला असते तर त्यांना पकडणे अवघड झाले असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या