कवी -वादळकार यांच्या ग्रामीण "आसक्या"कथासंग्रहाचे भीमाकोरेगाव विजयस्तंभाजवळ मानवंदना देऊन प्रकाशन सोहळा संपन्न

 कवी -वादळकार यांच्या ग्रामीण "आसक्या"कथासंग्रहाचे भीमाकोरेगाव विजयस्तंभाजवळ मानवंदना देऊन प्रकाशन सोहळा संपन्न-



भीमाकोरेगाव येथिल शूरवीरांच्या शौर्याच्या स्मरणार्थ त्यांना मानवंदना देण्यासाठी आंबेडकर अनुयायी लाखोंच्या संख्यने दरवर्षी येथे परिवारासह उपस्थित राहतात.या शूरवीरांच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी यावेळी उपस्थित होते.या लाखोंच्या उपस्थिती समोर नक्षञाचं देणं काव्यमंचचे राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे अर्थात कवी वादळकार,पुणे यांच्या "आसक्या"या ग्रामीण कथासंग्रहाचे प्रकाशन भीमाकोरेगाव शुरवीरांच्या विजयस्तंभाला मानवंदना देऊन दलित पॅंथरचे अध्यक्ष पॅंथर सुखदेव तात्या सोनवणे यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.


यावेळी सुखदेव तात्या सोनवणे प्रकाशन करताना म्हणाले,"या आसक्या मधील ग्रामीण कथा सामान्य माणसाला खेडोपाडी जीवन जगण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी ,अजुनही संघर्ष करावा लागतो.त्या ग्रामीण भागातील जीवनाचे वास्तव दर्शन या अस्सल ग्रामीण भागातील जीवनाचे वास्तव दर्शन या कथामध्ये आहे.विविध व्यक्तिमत्वांना लेखनाने आपल्या कथामध्ये रेखाटलेले आहेत.वाचकांना त्यांच्या लेखनीने खिळवुन ठेवण्याची ताकत यात आहे.अतिशय दर्जेदार या कथांची बीजे आहेत.वाचकांची भूक भागविणारा आणि वास्तवाकडे घेऊन जाणारा "आसक्या"हा ग्रामीण कथासंग्रह आहे."


भीमाकोरेगाव शूरवीर विजयस्तंभाजवळ झालेल्या सोहळ्यास सुखदेव सोनवणे,प्रा.राजेंद्र सोनवणे,शुभम सोनवणे,निलेश आल्हाट,विकास भोसले,बाबू वैराट,यवन पोतदार,सौ.उषा राजगुरु,साईराजे सोनवणे,सागर सावंत,रसिद शेख इ.मान्यवर उपस्थित होते.


एक जानेवारी या नूतन वर्षाच्या दिनी व भीमाकोरेगाव शौर्य विजयस्तंभाला २०४ वर्ष पुर्ण होत आहे.या प्रसंगाचे औचित्य साधुन कवी वादळकार,पुणे यांच्या "आसक्या"ग्रामीण कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या