सनातन्यांच्या गुहेत समतेचा दिवा
मानवाच्या वैयक्तिक विकासापेक्षा सामूहिक विकास फार आवश्यक तथा महत्वपूर्ण असून त्यांचे दीर्घकालीन पडसाद हे मानवी समाज जीवनात पहावयास मिळत असतात , या तत्वाच्या अनुषंगाने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांनी सनातन्यांच्या गुहेत समतेचा दिवा विचारांना तसेच कृतीला माध्यम बनवून पेटविला आहे. त्यांनी विचारास प्रासंगिक बनविले समोर आलेल्या बिकट प्रसंगात विचारानेच उत्तर दिले. सावित्रीबाई फुले यांना ज्ञात होते की विचार देखील सडतात जर त्यांना दररोज प्रासंगिक बनविले नाही तर .
सावित्रीबाई फुले व जोतीराव फुले एकमेकांना समजून घेणारे जगातील एक आदर्श जोडपे होते. तसेच समाजक्रांतीच्या इतिहासातील ही अग्रणी जोडी होत. ज्यावेळी 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिराव फुले यांचे पक्षाघाताने निधन झाले त्यावेळी सावित्रीबाई एकाकी पडल्या, तेव्हा सनातन्यांनी अशी आव उठवली की समतेची ही लढाई आता मुळा -मुठाच्या पाण्यात विसर्जित झाली परंतु जगरहाटी बदल करावयास निघालेल्या, जी सामान्य माणूस पटकन स्वीकारत नाही परंतु सावित्रीबाई फुले त्यांनी मागे पाऊल न घेता समतेची झुंजार लढाई मुळा-मुठाच्या प्रवाही पाण्यासारखी पतीच्या निधनानंतर सात वर्षे म्हणजे हाँगकाँग बंदरातून मुंबई बंदर व्हाया पुण्यात सन 1897 च्या आरंभाला प्लेगच्या आगमनाने जो संसर्गजन्य रोग होता त्याकाळी सामान्य तसेच पीडित लोकांची काळजी घेत असताना म्हणजे दहा मार्च 1897 त्यांच्या निधनापर्यंत कायम वाहत ठेवली, त्यांनी त्यांच्या जीवन कार्यात समतेची लढाई विसर्जित होऊ दिली नाही.
भारतातील तमोयुगात शिक्षिकेचा पेक्षा पत्करण्याचे अलौकिक धाडस करुन तत्कालीन नागरी समाजाचा हरवलेला चेहरा बदलण्या कामी हेटाळणीची परिसीमा झाली तरी न डगमगता सावित्रीबाई फुलेना जगरहाटी बदल करताना होणारा शारीरिक तथा मानसिक त्रास कसा झाला याचे एक उदाहरण म्हणजे पोते शिक्षण पद्धती, ही पद्धती अल्पकाळ चालली परंतु सनातन्यांची मानसिकता यातून पहावयास व अनुभवयास देखील मिळाली. पोते शिक्षण पद्धती म्हणजे शाळेत शिक्षण घेण्याकामी दाखल केलेल्या आपल्या मुलींना पालक पोत्यात घालीत असत व ते पोते पालक खांद्यावरून वाहून शाळेत सुरक्षित नेत असत. वर्गात दाखल झाल्यावर विद्यार्थिनी शिक्षण घेण्याकामी सुखरूप बाहेर पडत. तात्या भिडे यांच्या वाड्यात ज्या ठिकाणी खूप मेहनतीने सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी सार्वत्रिक शैक्षणिक वातावरण तयार केले होते.
सावित्रीबाई फुले यांच्या एका हातात शिक्षण आणि दुसऱ्या हातात समाजसुधारकांची वृत्ती होती, असा बाणा सामाजिक चळवळीच्या इतिहासाची पाने चाळलीअसता खूपच अल्प प्रमाणात नजरेस येत असतात.
हेमकांत मोरे,
नंदुरबार .
94 23 91 70 74.

0 टिप्पण्या