कर्मवीर अकॅडमीने देवळाली च्या वैभवात भर घातली - आप्पासाहेब ढुस

 कर्मवीर अकॅडमीने देवळाली च्या वैभवात भर घातली - आप्पासाहेब ढुस



देवळाली प्रवरा - दि. ३१ डिसेंबर  येथील कर्मवीर करीअर अकॅडमी ने देवळाली च्या वैभवात भर घातली असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खेळाडू  आप्पासाहेब ढुस यांनी केले. 

        अकादमीच्या सैनिकी तथा पोलीस प्रशिक्षण केंद्राचा ३१ डिसेंबर रोजी साध्या पद्धतीने  १८ वा वर्धापनदिन संपन्न झाला त्या प्रसंगी ढुस बोलत होते. 

       राहुरी अर्बन संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व देवळाली नगरपालिकेचे माजी नगरसेवक विस्वास पाटील उपस्थित होते.

      प्रसंगी बोलताना ढुस पुढे म्हणाले की  १८ वर्षात ४५०० विद्यार्थी या अकादमी मध्ये प्रशिक्षण घेऊन पोलीस आणि सैन्यदलात भरती झाले आहेत. अकॅडमी चे अध्यक्ष मेजर राजेंद्र कडू यांनी सैन्यातून सेवानिवृत्त झालेवर ठरवले असते तर पेन्शन घेऊन आरामात जीवन जगले असते, परंतु तसे न करता हॉटेल व्यवसायाकडे वळण्या ऐवजी  आईने केलेल्या संस्कारा प्रमाणे देशाचे भावी सैनिक घडविणेसाठी गेली १८ वर्षे आयुष्य वेचले आणि आज पावेतो तब्बल ४५०० सैनिक व पोलीस घडविले. यामुळे देवळाली शहराचे नाव या अकॅडमी मुळे राज्यात नव्हे देशात पोहचले.  त्यामुळे कर्मवीर करियर अकॅडमी ने खऱ्या अर्थाने देवळाली प्रवरा शहराचे वैभवात भर घातली आहे.  

       प्रसंगी नुकत्याच पोलीस भरती झालेल्या विद्यार्थीनिंचा सन्मान मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. 

      या प्रसंगी अकॅडमीचे अध्यक्ष मेजर राजेंद्र कडू, संचालिका सौ. ज्योती राजेंद्र कडू, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या