ती अनधिकृत इमारत जमीनदोस्त होणार...

 ती अनधिकृत इमारत जमीनदोस्त होणार...



डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील सागाव येथे एका इमारतीच्या  लिफ्टसाठी खणलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून १० वर्षीय सत्यम मौर्य यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी कुटुंबीयांनी  निष्काळजीपना करणाऱ्याविरुद्ध ठोस कारवाईची मागणी पोलिसांकडे केली आहे.या घटनेनंतर पालिका प्रशासनाने ठोस पाउले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत `इ`प्रभाग क्षेत्राचे सहायक आयुक्त भारत पावर यांना विचारले असता त्यांनी सदर इमारतीवर कायदेशीर कारवाई केली जाईल,काही दिवसातच हि इमारत पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली जाईल असे सांगितले.जयेश म्हात्रे यांनी सदर इमारतिचे बांधकाम केले होते. मात्र यात वाद आणि करोना आल्याने बांधकाम अर्धवट राहिले. गेल्या वर्षी जयेश म्हात्रे यांच्यावर प्रशासनाने एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.यापुढे २७ गावातील पडक्या ठिकाणचे बांधकाम आणि अश्या प्रकारच्या अर्धवट इमारतीं जमीनदोस्त केल्या जातील अशी मोहीम हाती घेतली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या