कल्याण - डोंबिवलीत गहाळ झालेले ३२ मोबाईल शोधण्यास पोलिसांना यश

 


कल्याण - डोंबिवलीत गहाळ झालेले ३२ मोबाईल

शोधण्यास पोलिसांना यश  



कल्याण  ( शंकर जाधव )कल्याण मधील महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस हद्दीत या हद्दीतील कल्याण डोबिवली तसेच कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर जिल्हयातुन येणारे लोकांचे  २०१९, २०२०, २०२१ या तीन वर्षात या कालावधीत वेगेवगळ्या कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली होती.हे मोबाईल शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. 

    अपर पोलीस आयुक्त  दत्ता कराळे  पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ  परिमंडळ-३, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाने  वाहन व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे एच.जी.ओऊळकर, पवार, गायकवाड, वाघ,वळवी, चव्हाण यांनी  माहितीच्या आधारे शोध घेवुन अंदाजे एकुण ४,५०,००० किंमतीचे ३२  मोबाईलचा शोध घेवुन मोबाईल मालकांना परत केले.

ही  कामगिरी अपर पोलीस आयुक्त , सहाय्यक पोलीस आयुक्त  उमेश माने-पाटील  यांचे मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक हणमंत ओऊळकर  , गायकवाड, चव्हाण यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या