अमृत योजनेतील जलकुंभाच्या जागेवरून जागेवरून शिवसेना-मनसेत श्रेयवाद

 अमृत योजनेतील जलकुंभाच्या जागेवरून  जागेवरून शिवसेना-मनसेत श्रेयवाद



 डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समविष्ट झालेल्या २७ गावात अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी मिटावा यासाठी शासनाच्या `अमृतयोजना`अमंलात आणली जात आहे.केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत २७ गावांपैकी ७ गावांमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.मनसेचे कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे सांगितले. मात्र युवा सेना पदाधिकारी तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी हे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने झाल्याचे सांगत मनसेने शिवसेनेच्या कामाचे श्रेय घेऊ नये, जनतेच्या हितासाठी शिवसेनेला मदत करावी असा सल्ला दिला.मनसे- शिवसेना याच्या या श्रेयवाद सुरु झाला असल्याचे यावरून दिसून येते.


  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ७ गावांमध्ये अमृत योजने अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. जलवाहिन्या टाकण्याल्या असल्या तरी आवश्यक असणाऱ्या जलकुंभासाठी जागेचा प्रश्न होता.यावर मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत जागेची पाहणी केली होती.अखेर ७ गावांमध्ये जलकुंभासाठी जागा मिळाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. मात्र युवा सेना पदाधिकारी तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी मनसेवर आक्षेप घेतला आहे.मनसेकरून हे काम झाले नसून कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने हे काम झाल्याचे सांगितले.


 म्हात्रे पुढे म्हणाले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी २७ नोव्हेबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. नार्वेकर यांच्याबरोबर बैठक झाली होती. जनतेच्या हितासाठी शिवसेनेचे प्रयत्न असल्याने जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली होती.त्यामुळे मनसेने या कामाचे श्रेय घेऊ नये. गेल्या वर्षभरात अमृत योजनेच्या कामासाठी खासदार डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्याने यश आले आहे.सुरुवातीला अडचणी आल्या पण त्यावर मात करून योजनेतील जलकुंभाच्या जागेसाठी मंजुरी मिळाली. मनसे शिवसेनेच्या कामांचे श्रेय घेण्याचे काम असून माझे त्यांना आव्हान आहे कि त्यांनी जलकुंभासाठी कुठे-कुठे जागा आहे हे सांगावे.


    याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांना विचारले असते ते म्हणाले,मनसे आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याने विकासाची कामे सुरु होत आहे.आमदार पाटील यांनी पाठपुरावा केल्याने जलकुंभासाठी जागेला मंजुरी मिळाली आहे.मनसेच्या या कामाचे शिवसेनेने कधीतरी अभिनंदन करावे.पण शिवसेनेने मनसेची पाठ थोपाववणारी नाही हे आम्हाला माहित आहे.शिवसेनेने रखडलेल्या कामाच्या जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत.उलट झालेल्या कामांचे श्रेय घेत आहे. अमृत योजनेचा शिवसेनेशी काय संबध ?


शिवसेनेच्या कामाचे श्रेय लाटण्याचे कामात मनसेची पीएचडी..


शिवसेनेने आजवर अनेक विकास कामे करून जनतेची माने जिंकली आहे.भोपर गावात मनसेने कामाचे बनर लावले आहे.मनसेने ७ गावातील कुठे कुठे जलकुंभाच्या जागेसाठी मंजुरी मिळाली आहे याची माहिती जनतेला द्यावीत असे युवा सेना पदाधिकारी तथा माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.


शिवसेनेने मोठे मन दाखवाव...


   अमृत योजनेबाबत मनसेच्या मनसेच्या पाठपुराव केल्याने खऱ्या अर्थाने काम सुरु झाले आहे. पाटील हे आमदार झाल्यावर शहरात कामे सुरु झाली आहे.जनतेला माहित आहे कि मनसे काय काम करत आहे.त्यामुळे शिवसेनेने मोठे मन दाखवाव आणि मनसेची कौतुक करावे असे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले.


 २७ गावातील उसरघर, माणोरे,द्वारली,भोपर,देसलेपाडा, कोळे,संदप,निळजे,हेदुटणे या गावांतील गुरुचरण, प्रांतिक सरकार इतर हक्क-परिवहन आयुक्त मुंबई यांचा आगाऊ ताबा,सार्वजनिक रस्ता, ग्रुप ग्रामपंचायत व प्रांतिक सरकार आदी प्रकारच्या जमिनीवर जलकुंभासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे वर्ग करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.त्यामुळे जलकुंभांची कामे अद्याप रखडली होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या