महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा आदर्श समाजसेवक-२०२२ पुरस्कार राहुल ढेंबरे पाटील यांना प्रदान...
बीड प्रतिनिधी -पत्रकार संघाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी 6 जानेवारी रोजी दर्पण दिन कोरोना नियमांचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला. दर्पणकार पुरस्कारासह यावर्षी समाज सेवेसाठी समर्पित झालेल्या समाजसेवकांचा देखील पत्रकार संघाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ संपादक संतोष मानूरकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बीड येथील स. मा. गर्गे भवन, नाट्यग्रह जवळ, डीपी रोड, बीड येथे गुरुवार दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सुप्रसिद्ध बासरी वादक अमर डागा यांचे सुश्राव्य लाईव्ह बासरी वादन एक तासासाठी झाले. यानंतर सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यावर्षीचा बीडचे दर्पणकार हा सन्मानाचा पुरस्कार ज्येष्ठ संपादक गुलाब भावसार यांना प्रदान करण्यात आला. तर आदर्श पेपर विक्रेते हा पुरस्कार ज्येष्ठ पेपर विक्रेते प्रतापराव सासवडे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. या दोन प्रमुख पुरस्कारा सोबतच यावर्षी समाज सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबाची, स्वतःची पर्वा न करता अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांना आदर्श समाजसेवक-२०२२ या पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरवण्यात आले.
जनसामान्य माणसाच्या अडीअडचणी शासनदरबारी मांडणे, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न, कोवीड काळातही जनसामान्यांना सर्वतोपरी मदत, सामान्य कुटुंबातील एक अष्टपैलू युवा सामाजिक नेत्रुत्व म्हटले तर राहुल बाजीराव ढेंबरे हेच होय.
यावेळी बीड च्या माजी आमदार उषाताई दराडे, मा.वसंत मुंडे,प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघ,
वैभव विवेक स्वामी ,मराठवाडा विभागीय अध्यक्ष
नागनाथ जाधव,बीड जिल्हा उपाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

0 टिप्पण्या