सावित्री

 सावित्री



तिने हात न उगारता

एकच कानाखाली लावली


ती देशाची झाली माऊली

ती बायकांची झाली सावली


आई एक शिकली तर

शिकवेल ती परिवाराला


खरे केले ज्योतिबाच्या

 सिद्धांताच्या या साराला


सोशिक सोज्वळ आणि जिद्दी

जाळली अज्ञानाची सद्दी


सोसले लेकींसाठी सारे

मार्तंडांची बनवली रद्दी


फुलासारखा शांत  निखारा

जाळून गेला काळ्या रात्री


सहस्त्रकातून एखादीच

माझी माय, आई सावित्री


 डॉ सतीश पवार 8108751520

कणकवली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या