अग्निशस्त्र विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक.महात्मा फुले पोलिस ठाण्याची कारवाई

 अग्निशस्त्र विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक.महात्मा फुले पोलिस ठाण्याची कारवाई



कल्याण ( शंकर जाधव )पिस्तुल विक्री करणाऱ्या एका इसमास महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या इसमकडून जिवंत काडतुसे , गावठी कट्टर, पिस्तुल आणि  मोटारसायकल सह जवळपास १ लाख २ हजार ९०० रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. याआधी देखील आरोपीवर डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात  गुन्हे दाखल आहेत. 

  मूळचा हरियाणा येथे राहत असलेला आणि सध्या घणसोली येथे राहणारा २६ वर्षीय गणेश राजवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या ऑल आऊट ऑपरेशन करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. अशाच ऑपरेशनसाठी  बाहेर जात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक  सरोदे यांना अनंत रीजेंसी येथे एक व्यक्ती अग्नीशस्त्र विक्रीसाठी येत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना ही माहिती सांगितल्या नंतर दोन पथके तयार करून अनंतं रीजन्सी जवळ संशयास्पद उभ्या असलेल्या गणेश याला अटक केली असून त्याच्या खिशातून ३ काडतुसे गावठी कट्ट्याची आणि ३ काडतुसे देशी पिस्तुलची अशी एकूण  ६ जिवंत काडतुसे, १ गावठी कट्टा, १ देशी बनावटीचे पिस्तूल , रोख रक्कम आणि काळ्या रंगाची मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहेत.  ३१ जानेवारी पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, उल्हासनगरचे पसहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत मोहिते,  उपसहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी मोरे, कल्याण विभागाचे उपास सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोले आणि महात्मा फुले खाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या  गुन्ह्याची उकल केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या