मानखुर्दमधील बाल सुधारगृहात प्रजासत्ताक दिनी बिस्किट वाटप

मानखुर्दमधील बाल सुधारगृहात प्रजासत्ताक दिनी  बिस्किट वाटप



मुंबई- मुंबई महापालिका हद्दीतील मानखुर्द- ट्रॉम्बे  येथील  राज्य  शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या चेंबूर बाल सुधार गृहात प्रजासत्ताक  दिनाचे औचित्य साधत पाक्षिक गुन्हे नोंदच्या वतीने मुलांना बिस्किटाचे  वाटप करण्यात आले.

यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत हे बिस्किटाचे पुडेनवाकाळचे उपसंपादक शंकर कडव यांच्या हस्ते आणि या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक संतोष  भालेराव व  पुष्पा भालेराव यांच्या उपस्थितीत बाल सुधार गृहाचे उपअधीक्षक अरुण  झेंडे यांच्याकडे सुपूर्त  करण्यात आले.अधीक्षक टी.एम.भिलवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या