शासकीय यंत्रणेचा वापर कसा केला जातो हे भाजपला चांगले माहित राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार

 शासकीय यंत्रणेचा वापर कसा केला जातो हे भाजपला चांगले माहित राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार  



डोंबिवली ( शंकर जाधव ) महाविकास आघाडी सरकार हे दडपशाहीचे राजकारण करत असून लोकशाही मार्गाने भाजपने मोर्चा काढणार हे कळल्यावर पोलीस यंत्रणेचा वापर करत भाजप कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या गेल्याचा आरोप भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला होता.यावर राष्ट्रावादिने पलटवार करत शासकीय यंत्रणेचा वापर कसा केला जातो हे भाजपला चांगले माहित असल्याचे सांगितले.राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकारांशी बोलत होते.यावेळी दिव्याग व्यक्तींच्या मागणीसाठी अपंग विकास महासंघाने तपासे यांना निवेदन दिले.   

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांचा वाढदिवस कल्याण येथील गेस्ट हाउस येथे कार्यकर्त्यांनी साजरा केला.यावेळी तपासे यांना छेडले असता  ते म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून महाविकास आघाडी सरकार राज्यात उत्तम काम करत आहे.लोकशाहीला दडपण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत नाही. शिवसेना – कॉंग्रेस करत नाही आणि राष्ट्रवादी तर अजिबात करत नाही. कोरोना काळात निर्बध असल्याने पोलिसांनी भाजपला मोर्चा काढण्याची परवानगी दिली नाही.१५ तारखेला निर्बध शिथिल झाल्यावर योग्य मागण्यासाठी लोकशाही मार्गाने कोणाला मोर्चा काढायचा असेल तर त्यांनी नक्की काढावा.शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग कसा केला जातो भारतीय जनता पार्टीच्या लोकांना माहित आहे.त्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात किंवा देशपातळीवर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून उत्तम विकास कामे होत आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे जनतेची कामे चांगल्या पद्धतीने करत असून महाविकास आघाडी सरकारवर नागरीक खुश आहेत असे तपासे यावेळी म्हणाले. 

भाजपा आमचा राजकीय शत्रू...

पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता पालिकेवर येईल. जिथे जिथे शक्य आहे तिकडे तिन्ही पक्ष एकत्र येतील  आणि आपली सत्ता स्थापन  करतील.भाजप आमचा राजकीय शत्रू असून त्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष मिळून जनतेची कामे करू असे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी यावेळी सांगितले.


 राज्यात ५० लाख दिव्यांग असून त्यांच्या अनेक मागण्या आहेत.मी अपंग विकास महासंघाला आश्वासन देतो कि यावर्षात दिव्यांगाच्या समस्यासोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव मांडीन. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांची प्रत्यक्ष दिव्यांगाची भेट करून देईन असेही आश्वासन तपासे यांनी यावेळी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या