आठवणी सिंधु ताई यांच्या
आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथांचा सांभाळ करणाऱ्या माई प्रत्येकाला आपल्याशा वाटत. त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाची त्या आपुलकीनं विचारपूस करत. त्यांच्या या स्वभावागुणानं हजारो नाती त्यांनी कायम जोडून ठेवली. २०१२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, २०२१मध्ये पद्मश्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुळच्याच बुद्धिमान असलेल्या माईंचं जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिक्षण झालं होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह पार पडला होता. आयुष्यात वेळोवेळी येणारा संघर्ष त्यांना समाजसेवेकडे नेत गेला. अनाथांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.
१९९४मध्ये पुण्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे आणले. इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. मुलांच्या शिक्षणासह खाण्यापिण्यासह कपड्यांची व्यवस्थाही केली. त्यांना लागणाऱ्या इतर जीवनावश्यक वस्तूही पुरविल्या.
या मुलांनी शिक्षण पूर्ण करावं, स्वतःच्या पायावर उभं रहावं, इथल्या मुलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं, हे स्वप्न माई पाहत होत्या. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांचं लग्नकार्यही विधीवत पार पाडणे हे कामही संस्था करते.
तुलसीदास वाघ कलाश्री आर्ट

0 टिप्पण्या