अरे व्हा, पोलिसांबरोबर शिवसैनिक गस्ती घालणार....

 अ रे व्हा, पोलिसांबरोबर शिवसैनिक गस्ती घालणार....



  डोंबिवली ( शंकर जाधव ) काही वर्षांपूर्वी  मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसैनिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घेतली होती. या कामाबाबत महिलावर्गानी शिवसेनेचे आभार मानले होते.पुन्हा एकदा शिवसैनिक पोलिसांना मदत करण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालणार आहे.ही गस्त डोंबिवलीत शहरात घातली जाणार असून चोरी, लुटणार अश्या घटना घडूच नये यासाठी या पर्याय असल्याचे दिसते. डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर परिसरात गेली अनेक दिवस घरफोड्या व चोऱ्या होत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गर्दुल्ले, दारुडे , टपोरी मुले यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर महिला वर्गात घबराट पसरली आहे.डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा  शिवसेना  शाखाप्रमुख गिरीश काळण यांची त्रिमूर्तीनगर येथील नागरिकांनी भेट घेऊन माहिती दिली.काळण यांनी नागरिकांना धीर देत शिवसेना या समस्येकडे लक्ष देऊल असे आश्वासन  दिले. काळण यांच्यासह इंदिरानगर शाखाप्रमुख प्रवीण पवार, वैभव राणे आणि किरण भेरे या शिवसैनिकांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी सचिन सांडभोर यांची भेट घेतली.त्रिमूर्तीनगर परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, शिवसेना पोलिसांबरोबर गस्तीला येईल असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या