माथाडी कामगार चळवळीत काम करायचे असेल तर चळवळीशी प्रामाणिक राहा . माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचे जाहीर आवाहन

माथाडी कामगार चळवळीत काम करायचे असेल तर चळवळीशी प्रामाणिक राहा . माथाडी नेते नरेंद्र पाटील  यांचे जाहीर आवाहन




मुंबई -  माथाडी कामगार चळवळीत काम करावयाचे असेल तर चळवळीशी प्रामाणिक रहा आणि माथाडी कामगार चळवळीच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी सतत सतर्क आणि अविरत कार्यरत रहाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद पाटील यांनी केले.


महाराष्ट्र राज्य माथाड़ी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या माथाडी भवन, तुर्भे, नवीमुंबई येथे युनियन व माथाडी कामगारांच्यावतिने नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसाच्या नवी मुंबईत अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता, त्या सोहळ्यात नरेंद्र पाटील बोलत होते.ते पुढे असेही म्हणाले की, स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी अहोरात्र मेहनत करुन निर्माण केलेली ही माथाडी कामगार चळवळ अभेद्य राहिली पाहिजे, आज अण्णासाहेब पाटील यांनी निर्माण केलेल्या माथाडी कायद्याचा फायदा स्वार्थी हेतुने अनेक माथाडी कामगार संघटना उठवित असून, त्यांना पायबंद घातलाच पाहिजे. अशा या अवस्थेत माझ्या माथाडी कामगारांची समस्या सोडवून त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले की मला समाधान लाभते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी केले, त्यांनी नरेंद्र पाटील यांच्या लढाऊ नेतृत्वाच्या कार्याबद्दल आपले विचार प्रगट केले. नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील यांनी त्यांच्या निधीतून माथाडी हॉस्पीटलमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध केल्याचेही त्यांनी सांगितले आणि तमाम माथाडी कामगारांच्यावतिने शुभेच्छा व्यक्त केल्या.युनियनच्या कायदेशिर सल्लागार व नगरसेविका अॅड्. भारतीताई पाटील यांनी आपल्या भाषणात अण्णासाहेब पाटील यांच्या कुटुंबियांचे माथाडी कामगार चळवळीचा आणि संघटनेच्या संघर्षमय कामाचा आढाव घेऊन नरेंद्र पाटील यांनी आतांपर्यंत सामाजिक, कामगार, राजकिय क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल विस्तृत माहिती देऊन नरेंद्र पाटील यांना सर्व कुटुंबियांतर्फे लाख-लाख शुभेच्छा व्यक्त केल्या.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांन केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी नरेंद्र पाटील यांनी व युनियनच्या बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर व महाराष्ट्रातील नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर येथील माथाडी कामगार कार्यकर्ते आणि मराठा बांधवांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील, दिलीप खोंड, खजिनदार गुंगा पाटील,उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील,अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील,माजी नगरसेवक मनोज जामसुतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या