बघा डोंबिवलीतील दुकानांवर अजूनही 'मराठी पाट्या ' नाहीत ...

 बघा डोंबिवलीतील दुकानांवर अजूनही   'मराठी पाट्या ' नाहीत ...



   डोंबिवली ( शंकर जाधव )  प्रत्येक दुकानांवर मराठी (देवनागरी लिपी) भाषेतून पाट्या लावाव्यात असे राज्य सरकारने निर्देश दिले आहेत. डोंबिवली शहरात मात्र काही दुकानांवर अजूनही मराठी पाट्या लावल्या नसल्याने सरकारच्या निर्देशाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतो.डोंबिवली पूर्वेकडील पालिकेच्या विभागीय कार्यालयजवळ असलेल्या पी पी चेंबर मधील रस्त्यासमोरील अनेक दुकानांवर अद्याप मराठी पाट्या लावलेल्या नाहीत.यावर पालिका प्रशासनाने  या दुकानांना अद्याप नोटीस का बजावली जात नाही यावर  शहरात चर्चा सुरू झाली आहे.

 मराठी पाट्यांसाठी मनसेने राज्यभर मोठे आंदोलन केले होते. डोंबिवलीतही यावर मनसैनिकांनी आवाज उठविला होता.मात्र आता मराठी पाट्या सक्तीचे असल्याचा  राज्यसरकारने अध्यादेश काढूनही जे दुकानदार या अध्यादेशाला जुमानत नाही अश्या दुकानांवर प्रशासन कारवाई करण्यास दिरंगाई दाखवत असली तरी मनसैनिक शांत का असा प्रश्न डोंबिवलीकरांकडून विचारला जात आहे.

    याबाबत डोंबिवली व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष दिनेश गोर यांना विचारले असता ते म्हणाले, डोंबिवलीतील ८० टक्के दुकानांवर मराठी पाट्या लावल्या आहेत.काही दुकानांवर मराठी पाट्या लावल्या नसतील तर त्या दुकानदारांनी दुकानांवर मराठी पाट्या लावल्या पाहिजेत. महाराष्ट्रात सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या