कोळीगीतांचा बादशहा

  कोळीगीतांचा बादशहा 



गेली पाच दशकांहून अधिक काळ कोळी गीतांचा दणदणीत आवाज दुमदुमत ठेवणारे, आपल्या गीतांना लग्न, हळद, वरातीसह अन्य कार्यक्रम, सोहळे  यातून हक्काचे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलेले, कोळीगीतांचा बादशहा शाहीर काशिराम चिंचय यांचं जाण वेदना देणार तर आहेच पण कोळी गीतांनाही पोरक करून गेलाय.

डोंगराच्या अरुन एक बाई चांद उगवला, या गो दांड्यावरून, डोल डौल वाऱ्यावर, मी हाय कोली, पारू ग पारु या त्यांच्या अजरामर गीतानी केव्हांच सातासमुद्र पार्क तर केलाच पण आजही जुनी, नवीन,  नूतन पिढी कार्यक्रमातून एकत्रितपणे त्यांच्या गाण्यांवर थिरकताना दिसतात हे यश, ही यशोगाथा शाहीर काशीराम चिंचयच मिळू शकतात, निर्माण करु शकतात  यात वाद नाही. समुद्रांच्या लाटेतून गीतांसाठी प्रेरणा घेणारे आणि इतरांना सकारात्मक ऊर्जा देत नवोदित गायक, कलावंतांचे प्रेरणास्थान असणारे, राहणारे शाहीर काशिराम चिंचय आपल्या अजरामर गीतां प्रमाणेच रसिक मनात, जनमनात चिरंतन राहतील. आदरपूर्वक आदरांजली.

 विश्वनाथ पंडित

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या