माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांना मातृशोक
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन सखाराम म्हात्रे आणि समाजसेवक बाळा म्हात्रे यांच्या मातोश्री द्रौपदीबाई सखाराम म्हात्रे यांचे आज सकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या १०४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ४ मुले,२ मुली, सून, नातवंडे आधी परिवार आहे. देवीचापाडा स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.

0 टिप्पण्या