1अखेर माझ्या गरूडझेप ग्रंथाला राजाश्रय लाभला.'
लेखक:-दत्ताराम घुगे.
(दहिसर, मुंबई)
मराठी साहित्य विश्वातील गरूडझेप हे माझे तिसरे पुस्तक होय.पहिले संतशिरोमणी शिर्डी साईबाबा,दुसरे सुविचारमाला,तिसरे गरूडझेप, पंधरा पंधरा वर्षांचा कालावधी प्रकाशनाचा कालावधीतील सुवर्णमध्य आहे.
गरूडझेप ग्रंथ सहकार बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ नेतृत्व, नवी दिल्लीत अनेक वर्ष केंद्रीय मंत्रीमहोदय, खासदार, कोकणसुपुत्र,जागतिक किर्तीवंत श्री सुरेश प्रभाकर प्रभूसाहेब यांच्यावरिल यशोगाथा सन 2020मार्च हरियाणा राज्यातील अध्यात्मिक आश्रमात महाशिवरात्र शुभमुहूर्तावर मित्रवर्य अर्जुन गोविंद पटेल आणि गुरूवर्य श्री श्रीकृष्ण देऊलकरानी मध्यरात्री गुरूचरणावर प्रथम पुष्प पुस्तक विमोचन केले.
पण मला गरूडझेप ग्रंथाला राजाश्रय मिळायला तब्बल दोन वर्षाचा कालावधी लोटला.पण ताडदेव येथील मित्रवर्य रामदास बाबूराव गजरे यांच्या परिश्रमातून मलबार हिल आमदार, भाजपा मुंबई अध्यक्ष श्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे माननीय महामुनीम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या सदिच्छा भेटीचा प्रस्ताव दक्षिण मुंबई मलबार हिल भाजपा मंडल अध्यक्ष श्री. अनील कांबळे साहेबांनी भारतीय दलित साहित्य अकादमी बृहन्मुंबई महानगरीय कार्यकारिणी अवघे सहा व्यक्तीची भेट गुरुवार दिनांक 06/01/2022सकाळी 11:वाजता ठरली. त्याप्रमाणे आमदार मंगलप्रभात लोढा जी यांनी आम्हाला राज्यपाल महोदय यांच्या बंदिस्त कार्यालयात सर्वांचाच उचित सम्मान केला.अलका सानप यांनी आपला नियोजित प्रकाशन 'सुमन'पुस्तक दिले तर माझे गरूडझेप दहिसर विधानसभा सदस्य आमदार मनीषाताई चौधरी यांच्या उपस्थितीत राज्यपाल महोदयाना ग्रंथ भेट देऊन या पुस्तकातील सुरेश प्रभाकर प्रभूसाहेबाची परिपूर्ण माहिती सांगितली तर राज्यपाल महोदयाकडून कौतुकास्पद बोल आपकी मेहनत कभी खाली नही जाईगी!खरंच मला हा राजाश्रय लाभला हेच माझे भाग्य आहे.धन्यवाद.
आपला स्नेहांकित
दत्ताराम घुगे.दहिसर

0 टिप्पण्या