स्वामी विवेकानंद शाळेत 'मायलेक हितगुज' कार्यक्रम
डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रामचंद्रनगर इंग्रजी माध्यम, मराठी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वतीने संस्थेच्या निर्देशानुसार शाळेतील विद्यार्थिनी व त्यांच्या मातापालकांसाठी 'मायलेक हितगुज' कार्यक्रम आज दि. आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात मासिक पाळी बद्दल असलेल्या गैरसमजुती रुढी-परंपरा व त्यामुळे होणारे दुष्परिणाम तसेच मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी व दरम्यान होणारे शारीरिक व मानसिक बदल यासंदर्भात मार्गदर्शक समर्थ नर्सिंग होम हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. रेवती आढाव यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी शाळा समिती सदस्या ॲड. माधुरी जोशी व शीला गवळी यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. शाळा समिती सदस्या ॲड जोशी यांनी संस्थेबद्दल बोलताना सध्याच्या कठीण काळात संस्था विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.तसेच फक्त पाठय पुस्तकाचा अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षित मुले नाही तर समाज आणि देशाच्या उन्नतीचा विचार करणारे नागरिक घडविणे हे संस्थेचे लक्ष आहे असे त्यांनी नमूद केले. प्रश्नोत्तरादरम्यान पालकांनी व मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या मनातील शंका विचारल्याव मार्गदर्शकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक हनुमंत जगताप, मराठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उर्मिला चव्हाण मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शालिनी डुंबरे यांनी शाळा समिती सदस्या ॲड जोशी यांच्या मार्गदर्शनखाली केले. नियोजन जबाबदारी वैभवी तरटे व शोभना भंगाळे यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनची जबाबदारी वैभवी सावंत सांभाळली तर व आभार प्रदर्शन स्वाती माळवदे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्टपणे करण्यात आले व सर्वांच्या शंकानिरसन शास्त्रीय पद्धतीने झाले. असे सांगत शाळा समिती सदस्या ॲड. जोशी यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करीत मर्यादित संख्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

0 टिप्पण्या