श्री सुनील खर्डीकर व कु. संकेत खर्डीकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२२ ने सन्मानित

 "गौरव महाराष्ट्राचा" पुरवणी विशेषांकाचे 

दिमाखदार प्रकाशन संपन्न


विविध क्षेत्रातील अनेकांना पुरस्कार देण्यात आले त्यात श्री. सुनील खर्डीकर व कु. संकेत खर्डीकर यांनाही महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२२  ने सन्मानित करण्यात आले.




ठाणे,दि.९ (प्रतिनिधी)


 महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६१ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून दै.मुंबई तरुण भारत आणि अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने तसेच हाय मीडिया लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने 'गौरव महाराष्ट्राचा' या पुरवणी विशेषांकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा रविवारी ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाटयगृहात संपन्न झाला.याप्रसंगी ३५ प्रभूतींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, ख्यातनाम कवी,गीतकार प्रवीण दवणे,अभिनेत्री संजिवनी जाधव आदींनी मुंबई तरुण भारत व अक्षरमंच प्रतिष्ठानच्या या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.कार्यक्रमाचे निमंत्रक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार आणि अक्षरमंचचे सचिव हेमंत नेहते यांनी अतिथींचे स्वागत केले.तर अक्षरमंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्तविकात संस्थेच्या वाटचालीसह विविध उपक्रमांचा आढावा घेतला आणि गौरव महाराष्ट्राचा या उपक्रमाची भूमिका समजावून सांगितली. 


 महाराष्ट्राच्या शैक्षणिक,सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत योगदान दिलेल्या मान्यवरांची ओळख समाजाला व्हावी.या हेतूने ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये 'गौरव महाराष्ट्राचा' या उपक्रमाअंतर्गत मुंबई तरुण भारतच्या सहकार्याने विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. गौरव महाराष्ट्राचा या विशेषांकाचे संपादन हेमंत नेहते तसेच लेखन व संपादन डॉ योगेश जोशी यांनी केले आहे. 

    या प्रसंगी संशोधन व उद्योग क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी बजावणारे डॉ गंगाधर मोतीराम वारके आणि ज्योतिष्य व साहित्यिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे ॲड.डॉ.सोपान विठ्ठल बुडबाडकर यांना महाराष्ट्र जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले तर,अन्य मान्यवरांना 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.सत्काराला उत्तर देताना डॉ.वारके यांनी स्वदेशीचा अभिमान बाळगा तसेच, स्वयंपूर्ण भारतासाठी विदेशात न जाता आपले कौशल्य इथेच उपयोगात आणण्याचा सल्ला युवापिढीला दिला. तर,संपादक किरण शेलार यांनी,अशी प्रेरणा देणारी मंडळी प्रकाशात आणण्यासाठी अशा प्रकारचे पुरस्कार व सोहळे मुंबई तरुण भारतच्यावतीने केले जात असल्याचे सांगितले. अभिनेत्री संजीवनी जाधव यांनीही आयोजक हेमंत नेहते , डॉ योगेश जोशी व सर्व सत्कारमूर्तीना शुभेच्छा दिल्या.

    "कोरोनाचा बाऊ करण्यापेक्षा पुरेशी काळजी घेऊन कोरोनासोबतच काम करावे लागणार आहे. भावी पिढीला मार्गदर्शक ठरावीत.अशा या प्रभुती आहेत.त्यांना पुढे आणणे त्यांचा गौरव करणे,गरजेचे आहे. अक्षरमंचच्या साथीने स्तुत्य उपक्रम राबवणाऱ्या मुंबई तरुण भारतचे विशेष कौतुक आहे.अशी इमानदार माणसे असतील तर मोदींना अभिप्रेत असलेला 'नवभारत' पाहता येईल."असे कौतुगोदगार आमदार संजय केळकर यांनी काढले.

    या प्रसंगी हेमंत नेहते यांनी लिहिलेल्या  उत्तम वक्तृत्वाची गुरुकिल्ली पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानदीप विद्यामंदिर मुंब्रा शाळेचे सतीश देसाई (अध्यक्ष) समीर देसाई (सचिव),शिवानी देसाई (उपाध्यक्ष), प्रवीण देसाई (खजिनदार) उपस्थित होते.

    "अश्रूंचे मार्केटींग न करता, कोणतीही सवंग लोकप्रियता न विकता निर्धाराने महाराष्ट्र घडवु पाहणाऱ्या मुंबई तरुण भारत ची 'त्रिसुत्री' सर्वस्पर्शी आहे.तेव्हा,स्वामी विवेकानंदानी म्हटल्याप्रमाणे न डगमगता संकटांच्या छाताडावर पाय रोऊन धबधब्यासारखे काम करीत राहा "अशा शुभेच्छा कवी प्रविण दवणे यांनी व्यक्त केल्या. 

    या प्रसंगी मिलिंद पाटील ( उद्योजक) , राजन मराठे (माजी नगरसेवक),शिरीष बेंडाळे (उद्योजक) , डॉ. सुनिल खर्डीकर (शैक्षणिक), राजश्री मेणकुदळे (शैक्षणिक), किसन बोंद्रे (समाजसेवा),विजय गावडे (उद्योजक), लिलाधर महाजन (साहित्यिक), प्रकाश चौधरी (समाजसेवा), विजयकुमार देसले (शैक्षणिक) , कैलास शिंदे (सामाजिक),शिवानी सतीश देसाई व प्रवीणा समीर देसाई  (शैक्षणिक), जयंत भावे (साहित्यिक), जयंत झांबरे (उद्योग),डॉ ज्योती परब (शैक्षणिक), सुनिल म्हसकर (शैक्षणिक), देविदास म्हात्रे (शैक्षणिक), मच्छिंद्रनाथ मुंडे ( समजसेवा), डॉ. शमशाद बेगम मुल्ला (शैक्षणिक),  विलास सातपुते (साहित्यिक), राजेंद्र गोसावी (पत्रकारिता), डॉ प्रकाश माळी (सामाजिक), निलिमा पाटील (शैक्षणिक) , गीता जोशी (उद्योजक),शलाका परदेशी (उद्योजक),साक्षी परब (सांस्कृतिक),उत्कर्ष नेमाडे (सांस्कृतिक),संकेत खर्डीकर (शैक्षणिक),करिश्मा खर्डीकर (क्रीडा),स्नेहल पवार (उद्योग), स्नेहल सोपारकर (शैक्षणिक),मनोज राय (उद्योग), खेमचंद पाटील (पत्रकारिता),श्रेया देसाई (क्रीडा) यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या