केडीएसी हद्दीतील सोसायटी 'हा' नियम पाळा, अन्यथा भरावा लागणार दंड ..

 


केडीएसी हद्दीतील सोसायटी 'हा' नियम पाळा, 

अन्यथा भरावा लागणार दंड ..



डोंबिवली ( शंकर जाधव ) 

कल्याण डोंबिवली महापलिका क्षेत्रात वेगाने वाढणाऱ्या करोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सोसायट्याना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर काही निर्बंध लादण्यात आले  आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्याना पहिल्या वेळी ५ हजार आणि दुसऱ्या वेळी १० हजार रुपयाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.तर कल्याण डोंबिवली आयुक्तांनी काढलेल्या नव्या आदेशात कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किरकोळ ग्राहकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून घाऊक व्यापारी आणि त्यांच्या कर्मचार्यांनी करोना लसीचे दोन डोस घेतलेले असल्यासच त्यांना प्रवेश देता येणार आहे. तर बाजार समिती प्रशासनाने समितीच्या आवारात येणाऱ्या वाहनाची संख्येवर नियंत्रण न आणल्यास दुसऱ्या लाटेप्रमाणे ५० टक्केच वाहनांना आणि व्यापार्यांना प्रवेश देण्याचे निर्बंध लादले जातील असा इशारा आयुक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला दिला आहे. तर शहरातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले असून मॉल आणि  मार्केटला देखील नियमाचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्याच बरोबर  ज्या सोसायटीतील 25 टक्के नागरीक पॉझीटीव्ह आल्यास त्या सोसायटीतील नागरीकांनी कोरोनाची अॅण्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी. तसेच ज्यांनी लसीकरण केले नाही. त्यांनी लसीकरण करुन घ्यावे. ज्या सोसायटय़ा कोरोना नियम पाळणार नाही. त्या सोसायटीला पहिल्या वेळेस पाच हजार आणि दुस:या वेळेस दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या