बाऊन्सर बनून फिरणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये ..


   मनसे आमदार प्रमोद (राजू ) पाटील





डोंबिवली  ( शंकर जाधव ) युवा सेना पदाधिकारी तथा शिवसेनेचे माजी नगरसेवर्क दीपेश म्हात्रे यांनी मनसे आमदार प्रमोद (राजू )पाटील यांच्यावर अमृत योजनेतील जलकुंभाच्या जागेवरून टीका केली होती.यावर मनसे आमदार पाटील यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. पाटील म्हणाले, २७ गावातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी मी प्रशासनाकडे सतत  पाठपुरावा सूरु आहे.तसे माझ्याकडे पत्र आहेत. ठाण्याचे मालक सांगतील तितकेच हे  बोलतील,ते किती वेळ सहन करणार. आमच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत. मालक म्हणून फिरायचं तर बाउन्सर म्हणून फिरतात अश्यांनी  आमच्यावर टीका करू नये

.----------------------------------------

कोव्हीड हा आजार होता नंतर बाजार केला 


जुन्या कोव्हीड सेंटरचे ऑडिट झाले पाहिजे. कोव्हीड सेंटर मधील यंत्रसामग्री काय झाली ती पुन्हा वापरता येईल का ? हे पहिले पाहिजे. कोव्हीड संपत असताना जो कोव्हीड सेंटर बनवला गेला , जो अर्धवट पडला होता. तो आता पुन्हा सुरु केला आहे. हरकत नाही लोकांना त्याची गरज सुद्धा लागू शकते. याच सोबत जी जुनी सामुग्री होती त्याचे काय झाले ? जुने व्हेंटिलेटर वापरणार आहेत कि नाही ? याचा कुठेतरी ऑडिट व्हायला हवे ! प्रशासनाला जिथे आमची मदत लागेल तिथे मदत करणार. परंतु मागच्या वेळीस जे घोळ झाले ते पुन्हा व्हायला नको यावर आमचे लक्ष असेल असा इशाराच मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या