राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानात गांधींच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास रोखले....

 राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानात गांधींच्या पुतळ्यास अभिवादन

करण्यास रोखले....

राष्ट्रवादीचे अर्धनग्न आंदोलन 



डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला गांधींच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास रोखण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल जिल्हध्यक्ष निरंजन भोसले यांनी डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी उद्यानासमोर अर्धनग्न आंदोलन केले.

  डोंबिवली पश्चिमेकडील पु.भा.भावे सभागृहासमोरील महात्मा गांधी उद्यानात राष्ट्रपिता गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल कल्याण जिल्हाध्यक्ष निरंजन भोसले गेले असता उद्यान बंद होते.या उद्यानाची चावी पालिकेच्या एकही कर्मचाऱ्याकडे नव्हती.असे असताना उद्यानाची चावी कोणाकडे असते असा प्रश्न भोसले यांनी उपस्थित केला.

  भोसले म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला प्रत्येक वर्षी म.गांधी उद्यान उशिरा उघडले जाऊन म. गांधींच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करायला येणाऱ्यांना अप्रत्यक्ष पणे रोखले जाते. याचा मी निषेध करतो. ह्या उद्यानाच्या गेट ची चावी भाजप नगरसेवका कार्यालयात ठेवलेली असते.हे कार्यालय रात्री उशिरा पर्यंत उघडे असते व सकाळी उशिरा उघडले जाते. आजच्या दिवशी तरी महानगर पालिका प्रशासनाने ह्या उद्यानाच्या गेटची चावी पालिकेकडे ठेवणे आवश्यक होते. उद्यान सकाळी ७ वाजता उघडायला हवे होते पण तसे न होता १० वाजे पर्यंत हे नागरिकांसाठी उघडे केले नव्हते. म.गांधींना विनम्र अभिवादन करताना रोखणारे म. गांधी खुन्याचे समर्थक आहेत का? हा संशय नेहमीच माझ्या मनात येत असतो. मी अशा प्रवृत्तीचा निषेध करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या