"ओंजळीतील शब्दफुले" आयोजित "आम्ही ओंजळकर" स्नेहसंमेलन डोंबिवली पूर्व येथे संपन्न

 "ओंजळीतील शब्दफुले" आयोजित "आम्ही ओंजळकर" स्नेहसंमेलन  रविवार दि.३० जानेवारी २०२२ सकाळी ९ ते सायं. ६ यावेळात फडके रोड, गणपती मंदिर, विनायक सभागृह, डोंबिवली पूर्व येथे संपन्न झाले.



या संमेलनात ओंजळीतील शब्दफुले या साहित्यिक समूहाचे ४५ सभासद उपस्थित होते.

संमेनाचे उद्घाटन अध्यक्ष कवी साहित्यिक मा.श्री.विजय फडणीस आणि प्रमुख अतिथी मा.कवयित्री साहित्यिका सौ.अंजली बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय फडणीस, विजय जोशी आणि माधव बेहेरे यांच्या कवितासंग्रहांचे पुनर्प्रकाशन झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैत्राली जोगळेकर आणि मानसी चापेकर यांनी केले.

"सप्तरंग" हा मान्यवर कवींवर आधारीत कार्यक्रम समूहाच्या सात कवींनी सादर केला (चैत्राली जोगळेकर, मानसी चापेकर, अजित महाडकर, विजय म्हामुणकर, रवींद्र कारेकर, मयुरेश देशपांडे आणि अनंत जोशी). सप्तरंग या कार्यक्रमाचे निवेदन विजय जोशी यांनी केले.

नंतर उपस्थित कवीगणांचे कवी संमेलन संपन्न झाले. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन श्री.रवींद्र कारेकर यांनी केले.

शेवटी आभार प्रदर्शन आणि फोटोसेशन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

समूह प्रशासक विजय जोशी, चैत्राली जोगळेकर, मानसी चापेकर यांनी हे संमेलन यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या