कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गांजा पुरवणाऱ्या इसमास अटक
डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांकडून तिघांना अटक
डोंबिवली ( शंकर जाधव ) धुळ्यातील आदिवासी भागातून विक्री होणारा गांजा खरेदी करून तो पुरवणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या टोळीचा डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीमधील डोंबिवलीत राहणाऱ्या आनंद शंकर देवकर या आरोपी कडून ३ लाख १० हजार ५०० रुपयाचा माल जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा इसम कॉलेजमधील विद्यार्थ्यांना गांजा पुरवत होता.
या प्रकरणातील रामनगर रोड येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर, शिरपूर येथे राहणारा रेहमल पावरा, संदीप पावरा , यांना अटक केली असून यातील दिनेश शिवाजी पावरा हा मुख्य आरोपी फरार आहे. एक इसम अंमली पदार्थ घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हॉटेल शिवमच्या बाजूस हा इसम पदार्थांची विक्री करणार असल्याचेही समजले होते. त्यानुसार सापळा रचल्यानंतर एक इसम मोकळ्या मैदानात दोन गोण्या घेऊन उभा असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेतले असता 20 किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. त्यानंतर तपास केल्यावर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आदिवासी भागातून गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यातील मुख्य आरोपी फरार आहे. अशा पद्धतीने कोणी गांजा विक्री करताना किंवा गांजा पिताना आढळून आले तर त्वरित ९८२३२२४५८४ किंवा ९९२२९९८६९८ या क्रमांकाला संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी केले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी मोरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उलगडला असून अधिक तपास ते करत आहेत.
हुक्का पार्लर बंद पाडणार
देशाची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये याकरता पोलीस कारवाई करत असून जनजागृती करत आहेत.पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असून डोंबिवली शहरातील हुक्का पार्लर बंद करण्याची मोहीम सुरु करणार असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि शेखर बागडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कारवाई करताना राजकीय दबाव आला तरी त्याची तमा न बाळगता कारवाई चालूच राहील याची ग्वाहीहि त्यांनी यावेळी दिली.
-------------------------------------------------------------------------------------------
भावाच्या पावलावर पाउल टाकत त्याचा पहिला विक्रीचा खेळ फसला ..
डोंबिवली पूर्वेकडील रामनगर रोड येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर यांचा भाऊ अंमली पदार्थ विक्री करायचा . मात्र भावाने यात हात बाहेर काढल्याने आनंदने या आपले नशीब आजमायचे ठरविले.आनंदचा हा अंमली पदार्थ विक्रीचा पहिला खेळ फसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला..
---------------------------------------------------------------------------------------------------
धुळे येथील शिरपूर मधील समामाऱ्या पाडा येथे राहणाऱ्या रेहमल लुळ्या पावरा ( २९ ) व संदीप छोटू पावरा ( २७ ) यांना येथील जंगलातून पकडणे पोलिसांना मुश्कील होते. यासाठी पोलिसांनी या दोघांना त्या ठिकाणी थेट जाऊन पकडण्यापेक्षा सापाला रचून अटक कशी केली यावर विचार केला, ठरल्याप्रमाणे पोलिसांनी एका व्यक्तीला या दोघांकडून अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी ग्राहक म्हणून पाठवले.या ग्राहकालकडे हे दोघे अंमली पदार्थ विकण्यासाठी आले असता पोलिसांनी त्याच्यांवर झडप घातली.

0 टिप्पण्या