ज्ञानदेव हांडे यांना महाराष्ट्र कार्यगौरव पुरस्कार प्रदान

 ज्ञानदेव हांडे यांना महाराष्ट्र कार्यगौरव पुरस्कार प्रदान 



मुंबई | प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते महाराष्ट्र कार्यगौरव पुरस्कार प्रदान करत सन्मान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष, कवी-लेखक अशोकराव टाव्हरे यांनी कृतज्ञता व्यक्त करत शिक्षण क्षेत्रातील कार्याला प्रोत्साहन दिले.प्रसंगी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य सहसचिव भानुदास शिंदे, जेष्ठ शिक्षक दिपक भोसले, महेश धारकर , सचिन सुपेकर , विलास शिंदे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या