चेंबूरच्या शहाजीनगरच्या रेल्वे लाईन लगतची एकही झोपडी तोडू देणार नाही

 चेंबूरच्या शहाजीनगरच्या रेल्वे लाईन  लगतची एकही  झोपडी तोडू देणार  नाही 

माजी  नगरसेवक राजेंद्र  माहुलकरांचा निर्धार



मुंबई  - चेंबूरच्या शहाजीनगर,खडी मशीन व परिसरातील रेल्वे लाईन लगत असलेली एकही  झोपडी रेल्वे  प्रशासनकडून तोडू  देणार नाही,असा  निर्धार माहुल गावचे कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांनी व्यक्त केला आहे.


या  परिसरातील  शेकडो  झोपडीधारकांची एक जाहीर सभा नुकतीच राजेंद्र माहुलकर अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी कॉँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र नगराळे, मनसेचे माऊली थोरवे,तसेच  राजेश धायकर,दिनेश  गायकवाड, संजय पवार, विजय  पवार, सतीश यादव, मुश्ताक शेख,बाशा शेख यांच्यासह शेकडो  झोपडीधारक उपस्थित होते. यावेळी माजी  नगरसेवक राजेंद्र  म्हणाले की, रेल्वे  प्रशासनाने  रेल्वे लाईन लगतच्या झोपड्या खाली  करण्यासाठी मुंबईत सर्वत्र  नोटिसा बजावल्या आहेत.

मात्र गेल्या अनेक वर्षापासून  चेंबूरच्या शहाजीनगर परिसरात राहणार्‍या एकाही  झोपडीधारकावर अन्याय  होऊ  देणार  नाही. हा लढा लढताना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर  सर्वात पुढे मी पुढे असेन. तसेच कायदेशीर लढण्यासाठीही मी  सर्वतोपरीने मदत करेन. कॉँग्रेसचे नेते,माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकहितासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा लढा  लढण्याचे आवाहनही यावेळी राजेंद्र माहुलकर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या