इमारती मधील लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून १० वर्षीय मुलाचा मृत्यू
डोंबिवली ( शंकर जाधव ) बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीत पूर्वेकडील सांगावं परिसरात घडली आहे.या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सत्यम मौर्य असे मृत मुलाचे नाव असून तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. डोंबिवली पुर्वेकडील सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगारच्या दुकानात काम करतात .पत्नी एक मुलगा एक मुलगी अस त्यांचं कुटुंब आहे .मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा सत्यम खेळण्यासाठी बाहेर गेला. खुप वेळ होऊनही सत्यम घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला.शोध घेऊनही सत्यम सापडला नाही.कुटुंबियांनी जवळील एका इमारती मध्ये जाऊन बघितले असता इमारतीच्या लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. या पाण्यात सत्यम चा मृतदेह आढळून आला.सत्यमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे .या प्रकरणी कुटुंबीयांनी निष्काळजीपना करणाऱ्याविरुद्ध ठोस कारवाईची मागणी पोलिसांकडे केली आहे.

0 टिप्पण्या