बामणवाडीचे सामाजिक कार्यकर्ते भीमराव कडव यांचे निधन
कराड - कराड तालुक्यातील बामणवाडी या गावातील पत्रकार शंकर कडव यांचे चुलत बंधू आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते भीमराव बाबासो कडव यांचे नुकतेच अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.ते ४६ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा - मुलगी ,भाऊ ,वहिनी असा परिवार आहे.भीमराव कडव हे गावातील कोणत्याही सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असत.त्यांच्या निधनाने बामणवाडी गावासह परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.काल रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शुक्रवार २१ जानेवारी रोजी त्यांचा रक्षाविसर्जन विधी बामणवाडीतील स्मशानभूमीत होणार आहे.

0 टिप्पण्या