कोरोना योद्धयांच्या सन्मानास वर्ल्ड पार्लमेंट
कटिबद्ध -डॉ. दत्ता विघावे
श्रीरामपूर -
मागील दोन वर्षांपासून कोविड-१९ ने संपूर्ण जगभर थैमान घातले असून त्यामध्ये लाखो लोकांनी आपले प्राण गमावले. त्यातील अनेकांना पुरेशी वैद्यकीय सेवाही उपलब्ध झाली नाही. काहींचे लॉकडाऊन मध्ये खाण्या पिण्याचे हाल झाले. या दुःखदायक वातावरणात रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर्स, सिस्टर्स, आरोग्य सेवक, समाजसेवक, पोलिस, सफाई कर्मचारी, विविध समाजसेवी संस्था, पत्रकार यांनी गरजवंताना उदार मनाने मोठे साह्य केले व आताही करत आहे. .
समाजातील गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाने त्यांना केलेल्या कामाची पावती व पुढील कार्यास प्रेरणा मिळण्यासाठी " वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरीयर्स " सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात येत आहे. आजतागायत देशभरातील पंधरा हजाराहून अधिक कोरोना योध्द्यांचा सन्मान ऑनलाईन व ऑफलाईन या दोनही प्रकारे वर्ल्ड पार्लमेंटने केला आहे.
डब्ल्यूसीपीए जनसेवेसाठी स्वतःच्या जीवाचे रान करणाऱ्या सच्च्या देशभक्तांच्या सदैव पाठीशी राहील व त्यांना प्रोत्साहीत करेल. असे प्रतिपादन डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे. त्याचबरोबर कोरोना बाधीतांना सहाय्य करणाऱ्या डॉक्टर्स, सिस्टर्स, आरोग्य सेवक, समाजसेवक, पोलिस, सफाई कर्मचारी, विविध समाजसेवी संस्था, पत्रकार शासकीय सेवेत कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आपण करत असलेल्या कार्याचा सविस्तर तपशील, पूर्ण नाव, पत्ता, मेल आयडी, मोबाईल नंबर, स्वतःचा पासपोर्ट फोटो wcpashrirampur@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे तसेच ९०९६३७२०८२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहनही डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे.

0 टिप्पण्या