मुंबई पोलिसांनी श्रीनगरमध्ये जाऊन केली ड्रग्ज तस्कर गुलजारची धरपकड

 मुंबई पोलिसांनी श्रीनगरमध्ये जाऊन केली ड्रग्ज तस्कर गुलजारची धरपकड




मुंबई -  मुंबईत चरस आणि इतर ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या बड्या तस्कराला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने काश्मीरमधील श्रीनगरमधून ड्रग्ज तस्कर गुल्जार अहमद खानला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट ६ ने ही कारवाई केली आहे. 


चरसची तस्करी करणारा  गुल्जार अहमद खान याच्यावर मुंबई पोलिसांची नजर होती.गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दहिसर टोलनाक्यावर २४ किलो चरस घेऊन जाणाऱ्या चौघांना अटक केली होती. त्या चौघांच्या चौकशीमध्ये प गुल्जार अहमद खानचे नाव समोर आले होते.त्याला श्रीनगर येथील मगरमल बाग परिसरातून अटक केली आहे.ही कारवाई पोलीस अधिकारी रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

काश्मीरमधील खराब हवामान आणि सातत्याने सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे  गुल्जार अहमद खान याला मुंबईत आणण्यास पोलिसांना उशीर झाला. खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या