पालिका आयुक्तांच्या आदेशाकडे कानाडोळा...

 पालिका आयुक्तांच्या आदेशाकडे कानाडोळा... 

डोंबिवलीत आठवडी बाजार सुरू..



डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार गर्दी करणारे ठिकाणावर कारवाई सुरू केली आहे.मात्र डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात व डोंबिवली विभागीय कार्यालयालागत फुटपाथवर बिनदास्तपणे आठवडी बाजार भरतो.त्यामुळे पालिका आयुक्तांच्या कारवाई आदेशाला पालिकेचे सहायक आयुक्त किशोर शेळके आणि रत्नप्रभा कांबळे आणि पथकांनी कानाडोळा केल्याचे दिसते.

   करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिकेने सुरू केलेली कारवाईत गर्दी करणास कारणीभूत ठरत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांना मोकळे रान दिल्याचे दिसते.पालिका प्रशासना अश्या प्रकारे निष्काळजीपणा करत असल्याने करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात कशी  आणणार असा प्रश्न  डोंबिवलीकर विचारीत आहेत.पालिकेचे फेरीवाले अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख  व कर्मचारी यांची दिखाव्याची कारवाई नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करणारी असल्याचे बोलले जात आहे.

  फक्त अनधिकृत फेरीवालेच नव्हे तर राजकीय आंदोलने, निदर्शने यावरही पालिका प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचे दिसते.करोना नियमाचे पालन न करणाऱ्या नागरिकांकर प्रशासन कारवाई करते त्याप्रमाणे नियमांचे पालन न करणाऱ्या राजकीय नेतेमंडळी , पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई का केली नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या