एमएमआरडीच्या दुर्लक्षितपणामुळे कल्याण-शीळ रोडवर अपघात होण्याची शक्यता

 एमएमआरडीच्या दुर्लक्षितपणामुळे कल्याण-शीळ रोडवर अपघात होण्याची शक्यता कॉंग्रेस पदाधिकारी शिबू शेख यांचा आरोप



 डोंबिवली ( शंकर जाधव ) रस्त्याचे काम सुरु असताना  अपघात टाळण्यासाठी  वाहनचालकांच्या माहितीसाठी याठिकाणी बॅरीगेट लावणे आवश्यक असते. मात्र कल्याण-शीळ रस्त्यावर सोनारपाडा येथील रस्त्यावर एमएमआरडीने रस्त्याचे काम सुरु केले मात्र बॅरीगेट लावले नसल्याने मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली.सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसून कोणीही जखमी झाले नाही.सोनिया गांधी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष तथा कल्याण-डोंबिवली कॉंग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष कल्याण-डोंबिवली कॉंग्रेस कमिटी शिबू शेख यांनी याठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीने ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करण्यास मदत केली.एमएमआरडीच्या दुर्लक्षितपणामुळे भविष्यात या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.


    याबाबत अधिक माहित देताना शेख यांनी अधिक माहिती दिली.ते म्हणाले, गेली अनेक दिवस या रस्त्यावर एमएमआरडी रस्त्याचे काम करत आहे.कामाची गती पाहता संथ असून अपघात होऊ नये म्हणून बॅरीगेट लावणे आवश्यक असताना तसे केले नाही.या निष्काळजीपणामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्रकचा अपघात झाला.याठिकाणी पहिले असता मी आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ट्रक चालकच्या मदतीला गेलो.ट्रकचालकाशी बोलल्यावर समजले कि त्याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यावर खडी टाकल्याने ब्रेक लागला नाही.परंतु सुदैवाने पुढे ट्रक थांबला.दरम्यान एमएमआरडीएने कल्याण-शीळ रोडवर सुरु केले काम अजूनही पूर्ण केले नाही. अर्धवट कामामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. एमएमआरडीएच्या अश्या कामकाजावर शेख यांनी नाराजी व्यक्त केली असून या परिस्थितीकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या